Ad will apear here
Next
डॉ. पंजाबराव देशमुख क्रीडा महोत्सव
डॉ. पंजाबराव देशमुख क्रीडा महोत्सवात  दणदणीत विजयनागपूर : येथील डॉ. पंजाबराव देशमुख क्रीडा महोत्सव क्रिकेट स्पर्धेतील साखळी सामन्यात तुळशीराम गायकवाड पाटील कॉलेजने दणदणीत विजय नोंदवला. दुसऱ्या सामन्यात डॉ. आंबेडकर महाविद्यालयाने केवळ सात धावांनी विजय संपादन केला. या क्रीडा महोत्सवाचे आयोजन धनवटे नॅशनल कॉलेजच्या शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने वसंतनगरच्या मैदानावर करण्यात आले होते.

नुकत्याच झालेल्या आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत तुळशीराम गायकवाड पाटील कॉलेजने संताजी कॉलेजवर तब्बल ८० धावांनी दणदणीत विजय नोंदवला. नाणेफेक जिंकून गायकवाड पाटील कॉलेजने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गायकवाड पाटील कॉलेजने १९.४ षटकांत १६३ धावांचा डोंगर प्रतिस्पर्धी संताजी कॉलेजसमोर ठेवला. गायकवाड पाटील कॉलेजच्या सागर झाडेने उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन करत अर्धशतक करून ५२ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले, तर रोहितने २६ धावा केल्या. ‘संताजी’चे गोलंदाज आदित्य व समीर यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. प्रत्युत्तर देताना संताजी कॉलेजचा संघ केवळ १५.४ षटकांत ८३ धावांवर बाद झाला. ‘संताजी’कडून ऋषभने सर्वाधिक २३ धावा केल्या. गायकवाड पाटील कॉलेजचा गोलंदाज सागर झाडे व निखिल नंदने प्रत्येकी तीन गडी बाद केले.

दुसऱ्या सामन्यात डॉ. आंबेडकर कॉलेजने झुलेलाल कॉलेजवर केवळ सात धावांनी विजय नोंदवला. नाणेफेक जिंकून झुलेलाल कॉलेजने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीला आलेल्या आंबेडकर कॉलेजने निर्धारित २० षटकांत पाच गडी बाद करून १७७ धावा केल्या. अक्षयने तुफान खेळी खेळून ७७ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले, तर प्रतीक बावणेने २६ धावा केल्या. झुलेलाल कॉलेजकडून रोहितने तीन, तर मयूरने एक गडी बाद केला. प्रत्युत्तर देताना झुलेलाल कॉलेजचा फलंदाज अमेयने ६७, तर मयूरने ३७ धावांचे योगदान दिले. आंबेडकर कॉलेजच्या अभिलाषने ३२ धावा केल्या, तर प्रतीक बावणेने एक गडी बाद केला.


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FYXRBC
Similar Posts
‘खेळाडूंनी स्वत:च्या गुणांचे उत्कृष्ट सादरीकरण करावे’ गडचिरोली : आदिवासी विकास विभागांतर्गत दर वर्षी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात राज्यस्तरीय व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा यामागील शासनाचा मुख्य हेतू आहे. आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक काटकपणा, धैर्य, चिकाटी हे क्रीडापूरक गुण उपजतच असतात. मागील वर्षी आपल्या जिल्ह्यात विभागीय क्रीडा संमेलन झाले
टेबल टेनिस स्पर्धा शनिवारपासून नागपूर : येथील डॉ. कृष्णकुमार स्मृती यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. आंबेडकर कॉलेज स्पोर्टस् अकादमीच्या वतीने शनिवारी, २७ मेपासून दीक्षाभूमी येथील आंबेडकर अकादमीच्या सभागृहात ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.   ‘या स्पर्धेत मुला-मुलींसाठी वेगवेगळ्या वयोगटानुसार विभागणी करण्यात आली आहे
‘सीएम’च्या वाढदिवशी महामृत्युंजय जप नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरची सर्व प्रकारची विघ्ने टळावीत, यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने २१ जुलैला महामृत्युंजय जप व पूर्णाहुती यज्ञ करण्यात येणार आहे. पक्षाच्या वतीने प्रभागातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. याखेरीज विविध आघाड्यांच्या वतीने
आंबेडकर अकादमीला ११९ धावांची आघाडी नागपूर : विदर्भ क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित १६ वर्षांखालील मुलांच्या आंतरअकादमी क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात डॉ. आंबेडकर क्रिकेट अकादमीने पोरवाल क्रिकेट अकादमीवर पहिल्या डावात ११९ धावांची आघाडी घेतली आहे. सिद्धेश कानतोडेच्या पाच बळींच्या जोरावर दुसऱ्या दिवसाअखेर आंबेडकर अकादमीने एक बाद १०१ अशी धावसंख्या उभारली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language